जीवन

                             जीवन
तुझे हात माझे हात
वाटेत कुणी येऊ नये त्यात
 मी वाहिले तुला माझे सर्वस्व
वाढले माझ्या प्रक्तनाचे वर्चस्व

मी न राहिले माझी सख्या रे
तुजविण माझे कोण आज रे
तुजसाठी दोन्ही हातात नमस्कार पाकल्या
गुंफुन घेई आयुष्य मरणाच्या श्रृंखला

संवेदना ही माझी उध्वस्त करू नकोस
तुझे नी माझे हात यांची गुंफण सोडु नकोस
मम जीवनाचा सुगंध चाफा सांगून गेला
तुझ्या जीवनाने माझ्या जीवनीला सुगंध आला.
                 :- मनोरमा ओगले

Comments

Popular posts from this blog

वाट